या ठिकाणच्या सरपंचाविरुद्धाचा अविश्वास ठराव मंजूर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. यामुळे तालुक्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान सरपंच गागरे यांच्याविरुद्ध सहा विरुद्ध दोन मतांनी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, म्हैसगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी सभा घेण्यात आली.

म्हैसगाव येथे तीन वर्षांपूर्वी नऊ सदस्य व एक लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनसेवा मंडळातर्फे जनतेतून सरपंच व दोन सदस्य विजयी झाले. विरोधी भाजपाप्रणित विकास मंडळातर्फे सात सदस्य विजयी झाले.

यापैकी विकास मंडळाच्या दोन सदस्यांचे सदस्यपद जात पडताळणी दाखला दिला नाही व शासकीय जमिनीत अतिक्रमण केल्याच्या कारणाने रद्द झाले. त्यामुळे विकास मंडळाचे पाच सदस्य राहिले. दोन सदस्य पदाच्या जागा रिक्त आहेत. विकास मंडळाचे पाच व जनसेवा मंडळाचा एक अशा सहा सदस्यांनी सरपंच गागरे ग्रामपंचायत कारभारात विश्वासात घेत नाहीत.

या कारणामुळे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी मतदान घेण्यात आले. यामध्ये सरपंच गागरे यांच्याविरुद्ध सहा विरुद्ध दोन मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24