Ahmednagar News : डीजे बंदीचा ठराव केल्याच्या मुद्दयावरून दोन गटात झालेल्या वादात एक तोळ्याची अंगठी गहाळ झाली आहे. याप्रकरणी तिघांविरूध्द पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक महिती अशी की, पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे डीजे बंदीचा ठराव केल्यावरून फिर्यादी शिवाजी सीताराम खिलारी यांनी तुम्ही डीजे बंदीचा ठराव कसा काय केला अशी विचारणा केली.
त्यावरून अरूणा प्रदीप खिलारी, प्रदीप बबन खिलारी, सुनील पोपट चव्हाण यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच यातील एकाने त्यांच्या डाव्या दंडावर मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादीच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन खाली पडली होती. नंतर ती मिळून आली नाही. तरी सदरची चेन यापैकी कुणीतरी चोरून नेली अशी फिर्याद शिवाजी खिलारी यांनी दिली. त्यावरून पारनेर पोलिसांनी वरील तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.