अहमदनगर बातम्या

साफसफाई करण्यावरून दोन कामगारांत वाद; एकावर चिकन तोडण्याच्या चाकूने केले सपासप वार…!

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : हॉटेलमध्ये काम करत असलेल्या दोन कामगारांत काऊंटरची साफसफाई करण्यावरून वाद झाले. मात्र ते वाढून यात एका कामगाराने दुसऱ्यावर चक्क चिकन तोडण्याच्या चाकूने सपासप वार केले आहेत .

यात एकजण जखमी झाला आहे. ही घटना नगर तालुक्यातील दरेवाडी फाटा येथील शौर्य चायनीज या हॉटेलमध्ये घडली आहे. तर श्रेयस रेवन भागीवंत (वय १८ रा. वांबोरी ता. राहुरी, हल्ली रा. दरेवाडी फाटा, ता. नगर) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नगर तालुक्यातील दरेवाडी फाटा येथील शौर्य चायनीज या हॉटेलमध्ये श्रेयस रेवन भागीवंत (वय १८ रा. वांबोरी ता. राहुरी, हल्ली रा. दरेवाडी फाटा, ता. नगर) व आचार्थी (पूर्ण नाव, पत्ता नाही) असे वाद झालेल्या दोन्ही कामगारांची नावे आहेत.

जखमी असलेल्या श्रेयस रेवन भागीवंत याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान भागीवंत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचार्थी (पूर्ण नाव, पत्ता नाही) या कामगाराविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

दरेवाडी फाटा येथे सुरज लोखंडे यांचे शौर्य चायनीज नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर श्रेयस भागीवंत व आचार्थी हे कामगार काम करत आहेत. दि. २७ जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ते दोघे हॉटेलवर असताना दोघेही साफसफाईचे काम करत होते. मात्र या वेळी काऊंटर साफ करण्यावरून आचार्थी याने श्रेयसला शिवीगाळ करून मारहाण केली.

तसेच चिकन तोडण्याच्या चाकूने श्रेयसवर दोन ते तीन वेळा वार करून त्याला जखमी केले. जखमी श्रेयसवर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान भिंगार कॅम्प पोलिसांना जबाब दिला असून पोलिसांनी याप्रकरणी आचार्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagarlive24 Office