विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या ‘त्या’ नराधमास अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-श्रीगोंदे तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या नराधमास श्रीगोंदे पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक विकास वैराळ यांनी जेरबंद केले. संतोष बबन सूर्यवंशी (३८, आढळगाव) असे या नराधमाचे नाव आहे.

२२ वर्षीय विवाहितेवर संतोष याने शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरात घुसून विनयभंग केला. पीडित महिलेने आरडाओरडा करून सुटका करून घेतली व श्रीगोंदे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

तपास अधिकारी पोलिस नाईक विकास वैराळ यांनी २४ तासांत आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

अवघ्या २४ तासांत वैराळ व महादेव काळे यांनी आरोपीचा शोध घेऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याबद्दल त्यांचे कौतूक होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24