Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे विना परवाना गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे बाळगणारा इसम गजाआड करण्यात आला आहे. कैलास आसाराम म्हस्के असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून,
त्याच्याकडून ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर,
पोसई. सोपान गोरे, पोहेकॉ.दत्तात्रय गव्हाणे, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र शेलार, पोना. रविंद्र कर्डिले, संदीप दरंदले, फुरकान शेख, पोकॉ. किशोर शिरसाठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.