अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ कर्जत: अल्पवयीन युवतीस पळवून नेणारा तरूण गस्तीवरील पोलिसांनी सोमवारी रात्री पकडला. उपनिरीक्षक अमरजीत मोरे, वाहनचालक हेडकॉन्स्टेबल उमाकांत गावडे, कॉन्स्टेबल अमोल मरकड हे रात्री गस्त घालत होते.
पहाटे ४.३० च्या सुमारास योगेश मारुती बेद्रे (पुनवर, ता. करमाळा) हा युवक दुचाकीवर अल्पवयीन युवतीस घेऊन जाताना दिसला. संशय आल्याने विचारपूस केली असता तो खोटे बोलत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिस ठाण्यात आणल्यावर त्याने आपण या युवतीला पालकांच्या संमतीशिवाय पळवून नेत असल्याचे कबूल केले. संबंधित युवतीच्या पालकांशी संपर्क करून पोलिसांनी तिला त्यांच्या ताब्यात दिले.