तब्बल ३७ कैद्यांना कोरोनाची झाली बाधा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- राहुरी येथील कारागृहातील ३२ कैद्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने दोन दिवसांत कोरोना बाधित कैद्यांची संख्या ३७ झाली आहे. या कैद्यांना जिल्हा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

बुधवारी ७० बाधितांची नोंद झाल्याने एकूण संख्या ११११ वर जाऊन पोहोचली. त्यापैकी ७०४ रूग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. ३७३ रुग्णांवर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, विवेकानंद नर्सिंग होम,

नगरचे शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालय, तसेच जिल्हा कारागृहातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. शहरातील बाधितांची संख्या ३६७ झाली आहे.

गेल्या अडीच महिन्यांत तालुक्यातील ३४ रूग्णांचा मृत्यू झाला. कोरोना रोखण्यासाठी १० ते १७ सप्टेंबरदरम्यान तालुक्यात लाॅकडाऊन पुकारण्यात आला होता. ठरावीक व्यवासायिक वगळता शहराच चांगला, तर तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24