सत्ता गेली म्हणून वैफल्यग्रस्त न होता आंदोलन करणे टाळले पाहिजे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- संपूर्ण जगभर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव जीवघेण्या वेगाने वाढत असून मोठ्या प्रमाणात राज्यासह देशातही कोरोनामुळे बळी जात आहेत.

अशा संकटकाळी तरी राज्यात कोरोना विषयावरून आंदोलन-संघर्ष-वाद होणे योग्य नाही. सत्तारूढ व विरोधी पक्षांनी समजुतदारपणे एकमेकांना प्रतिसाद देऊन कोरोना विरुद्ध एकजुटीने कसे लढायचे हे ठरवले पाहिजे.

राजकारण करायला आयुष्य पडलेले आहे. आजच्या परिस्थितीत आंदोलन होणे योग्य नाही, असे मत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केले.

राज्या-राज्यात विविध पक्षांची सरकारे आहेत. एकमेकांना दोष देण्याचे राजकारण सुरू झाले, तर ते सर्वांसाठी जीवघेणे ठरणार आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे.

म्हणून त्यांचे विरुद्धही आरोप्रत्यारोप, आंदोलने सुरू होऊन देशभरातील वातावरण बिघडून कोरोना विरोधातील लढा कमजोर होऊ शकतो, याचे भान सर्वांनीच ठेवणे गरजेचे आहे.

सत्तारूढ पक्षाने विरोधकांशी चर्चा करावी व विरोधी पक्षांनीही सत्ता गेली म्हणून वैफल्यग्रस्त न होता आंदोलन करणे टाळले पाहिजे, असे मत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24