कोरोनामुक्त होताच आमदार रोहित पवार उतरले निवडणुकीच्या रिंगणात

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराला सुरवात केली आहे. आमदार रोहित पवार यांना कोरोना झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार काहीसा थंडावला होता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र आता रोहित कोरोनामुक्त झाले असून ते आता निवडणुकीच्या रीगणात उतरले आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी भाजपच्या प्रचाराला सुरवात केली.

मात्र रोहित पवार नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रचाराचे नारळ फुटले नव्हते. मात्र आ.रोहित पवारांनी रात्री ट्विट करत आपण कोरोनातून बरे झाल्याचे कळवले आहे.

Advertisement

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोनामुळं थोडा त्रास होत असताना आपल्या सर्वांच्या सदिच्छा, प्रेम आणि वडीलधारी मंडळींच्या आशिर्वादामुळं मी त्यातून यशस्वीपणे बाहेर पडलो.

आता माझी तब्येत उत्तम आहे, त्यामुळं उद्या माझ्या मतदारसंघातील कर्जत शहराच्या दौऱ्यापासून मी पुन्हा नव्या जोमाने आपल्या सेवेत हजर होत आहे, असे सांगितले आहे.

शिवाय 18 जानेवारी पर्यंतचे दौऱ्याचे वेळापत्रक दिले आहे. 18 जानेवारीला कर्जत नगरपंचायतचे चार प्रभागांसाठी मतदान होईल तर 19 जानेवारीला सर्व 17 प्रभागांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांची एन्ट्री ही धमाकेदार होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Advertisement