लॉजवर देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-श्रीरामपूर शहरातील पंचशील लाॅजवर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह विशेष पोलिस पथकाने छापा टाकून देहव्यापारातील तीन मुलींची सुटका केली. लॉज व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

गुरुवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी एका हॉटेलवरही छापा टाकून दारूचा अवैध साठा जप्त केला. पंचशील लॉजवर देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास पोलिस उपअधीक्षक मिटके,

परीक्षाविधीन आयपीएस अधिकारी आयुष नोपाणी, पोलिस निरीक्षक मसूद खान, हेड काॅन्स्टेबल आर. एच. आरोळे, एस. जी. औटी, काॅन्स्टेबल ए. बी. पठाण, एम. एस. चव्हाण, महिला पोलिस नाईक जे. आर. घाडगे यांच्या पथकाने तेथे छापा टाकला.

लाॅजमध्ये तीन मुली आढळल्या. या तीनही मुली श्रीरामपुरातील असल्याचे समजते. पोलिस नाईक अश्विनी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लाॅज व्यवस्थापक गणेश खैरनार (वय २१, चितळी, ता. राहाता) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजून कोणकोणत्या लॉजवर अशा प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू आहेत, यावरही पोलिसांची करडी नजर आहे. दरम्यान, सायंकाळी उशिरा एका हाॅटेलवरही पोलिसांनी छापा टाकून अवैध दारू जप्त केली. दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24