भक्ष दिसताच बिबट्याने घेतली झडप; पहा पुढे काय झाले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील पठारभागात बिबट्यांची दहशत वाढत आहे.

नुकतेच शुक्रवारी (ता.15) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अकलापूर गावांतर्गत असलेल्या शेळकेवाडी येथे एका कारवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

परंतु, कारच्या सर्व काचा बंद असल्याने कारचालक तरुण बचावला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कारचालक गणेश दिलीप वाघ हा तरुण शेळकेवाडी येथून घारगावला कारमधून येत होता.

त्याचवेळी शेळकेवाडी येथे रस्त्याच्यालगत असेल्या उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक कारवर हल्ला केला. परंतु, कारच्या सर्व काचा बंद असल्याने आणि कार वेगाने पुढे नेल्याने गणेश वाघ हल्ल्यातून बचावले आहे.

या घटनेने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. दरम्यान, तीन-चार दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने दुचाकीवरुन जाणार्‍या नागरिकांवर बिबट्याने हल्ला चढविला होता. मात्र, प्रसंगावधान राखल्याने बालंबाल बचावले.

अहमदनगर लाईव्ह 24