अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- मोठ्या शहरामध्ये नोकरीला असलेली एक युवती काेरोना विषाणूच्या लॉकडाऊनमध्ये आपल्या गावी आली.
तिला गावातील प्राथमिक शाळेत असलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर या युवतीला घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.
मात्र, घरी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही युवती आपल्या प्रियकराबरोबर निघून गेली.
उक्कलगाव परिसरातील ही युवती मोठ्या शहरात नोकरीला होती. लॉकडाऊननंतर ती आपल्या गावी आली होती.
आरोग्य विभागाने तिला प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवले होते.
हा कालावधी संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्या प्रियकरासोबत सैराट झाली.
या युवतीचा प्रियकर युवकही याच परिसरातील आहे. मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला.
मात्र, दोघेही सज्ञान असल्याने नातेवाईकांचा नाईलाज झाला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com