जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी पै. मोसिम शेख

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी तिसर्‍यांदा फेरनिवड झाल्याबद्दल पै. मोसिमभाई शेख यांना नियुक्तीचे पत्र देऊन सत्कार करताना प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजित तांबे.

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस प्रशांत ओगले, जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्‍वर दिवटे, संगमनेर शहर युवक अध्यक्ष निखिल पापडेजा आदि उपस्थित होते.

याप्रसंगी सत्यजित तांबे म्हणाले, काँग्रेस पक्ष हा सर्वात जुना पक्ष असून, कार्यकर्त्यांमुळे तळागाळापर्यंत पक्षाचे कार्य आहे. काँग्रेस पक्षात काम करणारा कार्यकर्ता हा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून त्यांचे प्रश्‍न सोडविणार आहे.

पै.मोसिम शेख यांनी पक्षात दिलेले योगदान उल्लेखनिय आहे. त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा जबाबदारी देत आहोत.

ही जबाबदारी ते आणखी चांगल्या पद्धतीने पार पाडतील, असा विश्‍वास श्री.तांबे यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी पै. मोसिम शेख म्हणाले, पक्षाने दिलेल्या प्रत्येक काम आपण प्रामाणिकपणे केले असून,

काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यापर्यंत पोहचवून त्यांच्या अडचणी सोडविल्या आहेत. आता दिलेली जिल्हास्तरीय पदाची जबाबदारी आपण सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यात पक्षाचे काम वाढवू असे सांगितले.

जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्‍वर दिवटे यांनी युवक काँग्रेसच्या जिल्ह्यातील आढावा सादर केला तर निखिल पापडेजा यांनी सर्वांचे आभार मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24