Ahmednagar News : केंद्र सरकारने केलेल्या नवीन कायद्याविरोधात अर्थात हिट अँड रनप्रकरणी ट्रक चालकांनी दंड थोपटत एल्गार पुकारला आहे. त्यामुळे येथील पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्याने ट्रकचालक संपावर आणि जनता पंपावर अशी स्थिती निर्माण झाली आहे.
हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक चालकांनी वाहन चालविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अवजड वाहने रस्त्यातच उभी आहेत. तर पेट्रोल, डिझेल व भाजीपाला वाहतूक ठप्प होत आहे.
प्रत्येक पेट्रोल पंपावर आपल्या वाहनात इंधन भरण्यास गर्दी उसळली आहे. पेट्रोल पंप कोरडे पडल्याने अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेल शिल्लक नाही असे बोर्ड दिसू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना अडचणीस सामोरे जावे लागत आहे.
ऑल इंडिया ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष अमृतलाल मदाल यांनी अद्याप संपाची घोषणा केलेली नसल्याचे समोर येतेय; मात्र वाहनचालकच वाहने सोडून जात आहेत. ते संपावर ठाम असल्याने हा संप चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
शेतमाल वाहतुकीवर परिणाम कायद्यातील तरतुदी अन्यायकारक असल्याचा आरोप करीत वाहनचाक स्वतः च वाहन सोडून चक्काजाम करीत आहेत. त्यामुळे ळे कृषी, दूध, शेतमाल या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.