अहमदनगर बातम्या

राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना न्याय मिळवून देणार : आमदार राम शिंदे यांचे आश्वासन

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसंदर्भात येत्या अधिवेशनात आवाज उठवून राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.

असा शब्द आमदार प्रा.राम शिंदे यांनी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाशी चोंडी येथील निवासस्थानी बोलताना दिला.

आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्यावतीने आपल्या विविध मागण्यांसाठी यापूर्वी संप पुकारला होता. यावेळी शिष्टमंडळाशी वाटाघाटी करताना आरोग्यमंत्र्यांनी १ नोव्हेंबर २०२३रोजी विविध मागण्या मान्य केल्या होत्या.

यामध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक दिवाळी भेट २ हजार रूपये दिवाळीपुर्वी देण्यात येणार, आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात ७ हजार रूपयांनी वाढ करणार, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात १० हजारांची वाढ करण्यात येणार अश्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या.

त्याची अंमलबजावणी न झाल्याने परत १२ जानेवारी २०२४ पासून राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे.

त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या जामखेड तालुक्यातील शिष्टमंडळाने आमदार प्रा.राम शिंदे यांची चोंडी येथील निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या विविध मागण्यांवर न्याय तोडगा निघावा. यासाठी येत्या अधिवेशनात विधानपरिषदेत आवाज उठवणार असल्याचा शब्द त्यांनी शिष्टमंडळाला दिला. यावेळी मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.

Ahmednagarlive24 Office