अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण देखील चांगलेच तापू लागले आहे.(Ashok Sugar factory)
नुकतेच श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गुरुवार रोजी 158 जणांचे 163 अर्ज दाखल झाले. तसेच 181 जणांनी 373 जणांकरिता उमेदवारी अर्ज नेले आहेत.
आज शुक्रवार 17 डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज किती सभासद आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशोक कारखान्याच्या निवडणुकीसाठी 163 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करणार्यांमध्ये आजी-माजी चेअरमन,विद्यमान संचालक, शेतकरी संघटना, विखे तसेच आदिक समर्थकांचा समावेश आहे.
आज पढेगाव गटात-10, कारेगाव गटात-26, टाकळीभान गटात-16, वडाळा महादेव गटात-18, उंदिरगाव गटात-22, उत्पादक बिगर उत्पादक पणन संस्था-2,
अनुसूचित जाती जमाती-1, महिला राखीव-10, इतर मागास प्रवर्ग-10, विजाभाज/विमाप्र वर्ग-13 असे 128 उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले आहेत.
आज शुक्रवार दि. 17 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 20 डिसेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे.
21 डिसेंबर ते 4 जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत असून 16 जानेवारीला मतदान होऊन 17 जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे.