Ahmednagar News : खूप मोठा संघर्ष करून १७ गावांना पाणी आणलं आता. नऊ गावांसाठी आपल्याला गप्प बसून चालणार नाही. आपला लढा पाणी मिळेपर्यंत चालूच राहणार आहे.
नऊ गावातील शेतकऱ्यांनी सुद्धा पुढाऱ्यांना हार तुरे घालण्याऐवजी हक्काचे पाणी मागितले पाहिजे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी आखेगाव येथे केले.
आखेगाव व मुर्शदपूर येथील शेतकऱ्यांची बैठक आखेगाव शिवारात सातपुते वस्ती सोनवडा येथे आयोजित केली होती. या बैठकीस कृती समितीचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे, माणिकराव म्हस्के,
रंगनाथ ढाकणे, त्रंबकराव काटे, लक्ष्मणराव गवळी, सतीश काटे, राजू नजन, माजी सरपंच बाबासाहेब काटे, गणेश धावणे, विनायक काटे, बाबुराव काटे, मुरलीधर नाचन, वीर भाऊसाहेब,
जगन्नाथ ढाकणे, विठ्ठल नजन, बाळू नजन, देविदास नजन, आजिनाथ धावणे, दत्तात्रय झिजुर्के, शिवाजी काटे, विष्णू डोंगरे, भाऊसाहेब ससाने, माजी सरपंच संपत नजन, भानुदास काटे, राजू बोरुडे, सचिन बोरुडे, भगवान काटे, शरद पायघन, पोपटराव सातपुते,
श्रीकांत शिंदाडे, नारायण पायघन, सुरेश काटे, जगन्नाथ पाबळे, श्रीरंग हुलजुते, मंजाबापू झिजुर्के, कचरू डोंगरे आधी यावेळी प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी पुढे बोलताना काकडे म्हणाल्या की, गेल्या ५० वर्षापासून आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्यांना हे प्रश्न दिसले नाहीत का? घरणातील हक्काचे असणारे पाणी यांना आत्तापर्यंत शेतकऱ्यांना देता आले नाही.
शेतकऱ्यांच्या एकजूटीमुळे कृती समिती हे करून दाखवत आहे. याची जळजळ यांना होत आहे. या ९ गावामध्ये पाणी आल्याशिवाय कोणाचाही सत्कार करू नका.
आपल्या अडचणी, सामाजिक प्रश्न, विधायक कामे करण्यासाठी पदे असतात. सध्या पदांचा उपयोग थोडाफोडी करण्यासाठी व चांगल्या कामाला विरोध टीका करण्यासाठी करण्यात येत आहे हे सर्वांनी लक्षात घ्या. अॅड. काकडे म्हणाले परमेश्वराने मला बुद्धी दिली.
जायकवाडी धरणात आपल्या तालुक्याच्या नावाने शिल्लक असणारे पाणी आपण या दुष्काळी भागाला नऊ गावांना मिळून द्यावे. यावेळी ताजनापूर टप्पा एक व दोन याविषयी संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना काकडे यांनी दिली.
शेतकऱ्यांनी पाणी मिळेपर्यंत आपली एकीची वज्रमूठ कायम ठेवावी तरच आपण लढाई जिंकू शकतो असेही काकडे म्हणाले.
यावेळी ताजनापूरवर एक चित्रफित तयार केली होती ती त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दाखवण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण गवळी यांनी सूत्रसंचालन सतीश काटे यांनी तर आभार राजेंद्र
नजन यांनी मानले.