अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- तुम्ही आमच्याविरुद्ध विनयभंगाची केस का दाखल केली, असे म्हणत पाच जणांनी मिळून चार जणांना लोखंडी गज, काठी व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात घडली.
काल सायंकाळी चार वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील एका गावात आरोपींनी गैरकायद्याची मंडळी एकत्रित जमविली आणि फिर्यादीच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला.
आमच्या विरुद्ध विनयभंगाची केस का दिली. असे म्हणत फिर्यादी व त्याच्या पत्नीला आरोपींनी मारहाण केली. या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी सुरेश भास्कर झारेकर, बाबासाहेब भास्कर झारेकर, भास्कर सयाजी झारेकर, रोहिदास सयाजी झारेकर, अरुण रोहिदास थेवरकर (सर्व रा.माहेगाव, ता. राहुरी) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे.