अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर एमआयडीसीतील कंपनी मध्य कामाला आलेले आसाम मधील काही कामगार अडकले आहे , सर्व काम बंद असल्याने व पैसे नसल्याने त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती , आशा परिस्थितीमध्ये त्यांनी आसाम चे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार रिपून बोरा यांना Whatsapp द्वारे अडचण कळून मदतीसाठी विनंती केली
त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांना संपर्क साधला सदर व्यक्ती बद्दल मदतीची अपेक्षा व्यक्त केली, त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी त्वरित अहमदनगर युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे व शहर-जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांना सदर ठिकाणी जाऊन मदत करण्याच्या सूचना दिल्या , एमआयडीसी भागातील बी- ब्लॉक भागातील कंपनी मध्ये हे कामगार होते तेथे त्वरित शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाऊन संपूर्ण माहिती घेतली,
त्यांना किराणा समान नव्हते तसेच भाजीपाला आणण्यासाठी त्यांना कंपनीतून बाहेर देखील पडता येत नव्हते आणि पैसेदेखील संपल्यामुळे कामगार अस्वस्थ झाले होते ही माहिती घेतल्यानंतर युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांनी कंपनीच्या मालकाला देखील त्वरित फोन वर संपर्क साधला त्यांनी त्वरित आपल्या मॅनेजरला कंपनीत पाठवले व कामगारांच्या किरण्या ची व्यवस्था करण्यात आली व पैसे देखील देण्यात आले,
कामगारांना भाजीपाला व जीवनावश्यक सामान आणण्यासाठी लांब जावे लागते त्यामुळे वेळ लागत असल्याने पोलिसांच्या भिती ने ते जीवनावश्यक गोष्टींसाठी देखील बाहेर पडत नसत तर मयूर पाटोळे एमआयडीसी पोलिस स्टेशनला संपर्क करत तोही प्रश्न मार्गी लावला, या कामगारांना लवकरात लवकर स्व घरी परतण्याची इच्छा आहे त्यासाठी देखील युवक काँग्रेस प्रशासनाची संपर्क साधून प्रयत्नशील आहे. परंतु सध्या त्यांच्या सर्व अडचणी दूर झाल्यात अहमदनगर युवक काँग्रेस लॉक डाउन आहे तोपर्यंत कामगारांची पूर्ण काळजी घेईल असे त्यांनी सत्यजित तांबे यांना सांगितले .
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com