Ahmednagar News : नगरमधील प्रसिद्ध बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाच्या मालकावर प्राणघातक हल्ला, जागेवर तलवार, गावठी कट्टा आढळला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील गुन्हेगारी, हाणामारीचे प्रकार अलीकडील काळात खूपच वाढलेले दिसतात.

आता अहमदनगर शहरातील किर्लोस्कर कॉलनी (गुलमोहर रोड) या भागातील बन्सी महाराज मिठाईवाले या दुकानाचे मालक धीरज जोशी यांच्यावर काल (दि.१० फेब्रुवारी) रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याची घटना घडली आहे.

घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. मिठाई व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याच्या या घटनेने अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धीरज जोशी यांच्यावर हल्ला का झाला याचे कारण अस्पष्ट आहे. घटनेस्थळी तोफखाना पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. तपासाअंती या घटनेचे खरे कारण समोर येईलच.

नगर शहरातील गुलमोहर रोड परिसरात बन्सी महाराज मिठाईवालेचे संचालक धीरज जोशी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने प्राण घातक हल्ला चढवला.

या हल्ल्यानंतर धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले. या घटनेच्या ठिकाणी पोलिसांना एक तलवार आणि गावठी पिस्टल सापडले आहे.

मात्र हा हल्ला कशामुळे झाला हे अद्याप कळले नसून तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी पोहचले आहे.

रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडल्याने रात्री परिसरात काही काल तणावाचे वातावरण होते. सध्या यातील जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.