अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- जामखेड पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी खातरजमा करून तक्रार नोंद घेत असताना तक्रार देण्यासाठी आलेल्या लोकांनी गैरकायद्याचा जमाव जमवून तक्रार घेण्यास उशीर का करता असे म्हणत तक्रार घेण्याचे सरकारी काम करत
असलेले हेड कॉन्स्टेबल बापू गव्हाणे (नेमणुक जामखेड पोलीस स्टेशन) यांना धक्काबुक्की करून गोंधळ करून पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ करत हेका गव्हाणे यांना रेटारेटी करुन धक्काबुकी करत भिंतीवर ढकलून दिले व खाली पाडले.
तसेच लक्ष्मी नावाच्या महिलेने पाण्याच्या १ लिटरच्या बाटलीत आणलेले पेट्रोल स्वत:च्या अंगावर ओतून घेवून आग पटीने काडी लावून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.
काल रात्री ८ च्या सुमारास जामखेड पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी हेका बापू गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रामदास कंठिलाल पवार, लक्ष्मी कंठीलाल पवार,
जयश्री कंठिलाल पवार, व इतर दोन महिला व ४ इसम सर्व रा.गोरोबा टॉकीजजवळ, कुंभारतळे जामखेड यांच्याविरुद्ध जामखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे हे करीत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved