निवडणूक लढवावी, यासाठी सकारात्मक आहेत. श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांमधून उत्स्फूर्त पाठिंबा आहे. तालुक्यातील सर्वच नेत्यांना आजपर्यंत मी अनेक निवडणुकांत मदत केल्याने त्याची परतफेड या नेत्यांनी करावी. मी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत सर्व ताकदीनिशी लढणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी केली.
संत शेख महंमद महाराजांची पूजा करून अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले, की आ. बबनराव पाचपुते यांना नेते मानून त्यांना अनेक विधानसभा निवडणुकीत मदत केली. स्व. शिवाजीराव नागवडे यांना साखर कारखान्याच्या निवडणुकीत मदत केली. अनुराधा नागवडे यांच्यासाठी मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना थांबलो. त्यांना सदस्य केले.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत माजी आ. राहुल जगताप यांना मदत केली. मागील निवडणुकीत घनःश्याम शेलारांना मदत केली. आता मला मदत करण्याची जबाबदारी या सर्व नेत्यांवर आहे. राज्यातील नेते माझ्या संपर्कात आहेत.
कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करायची, याबाबत चाचपणी करीत असून, पक्षपातळीवर हा तिढा सुटला नाही, तरी अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम असल्याचे ते म्हणाले. माझ्या राजकीय जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे. विधानसभा जिंकलो किंवा हरलो, तरी पुढील वेळी दुसऱ्याला संधी देणार.
भविष्यात कोणतीच निवडणूक लढणार नसल्याचे सांगून ते म्हणाले, की विसापुरचा समावेश कुकडी प्रकल्पात व्हायचा असेल, तर त्याला राजकीय पाठबळ असणे गरजेचे आहे.
आमदारकीच्या रुपाने ते राजकीय पाठबळ मिळाल्यास विसापुरचा पाणीप्रश्न सोडून दाखवतो, असे शेलार यांनी सांगितले. या वेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुभाष काळाणे, सरपंच ऋषिकेश शेलार उपस्थित होते.