अहमदनगर बातम्या

अवघ्या २४ तासाच्या आत एटीएम फोडणारी टोळी जेरबंद

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- अवघ्या २४ तासाच्या आत एटीएम फोडणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. ही कारवाई कोतवाली पोलिसांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी एटीएम फोडून चोरीच्या घटना घडल्या आहेत.

नुकतीच पाईप लाईन रोडवर एकाच दिवशी दोन एटीएम फोडले होते.त्यात परत शहरातील माळीवाडा परिसरातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र यावेळी चोरट्यांचा तो प्लॅन फसला अन अवघ्या२४तासाच्या आत ही टोळी पोलिसांनी जेरबंद केली. सनी सूरजसिंग भोंड (वय २५, रा. संजयनगर, काटवन खंडोबा, अ.नगर), चिक्या उर्फ रोहित निवृत्ती मेहेत्रे (वय २५, रा. माळीवाडा) व सोनू सूरजसिंग भोंड (रा. काटवन खंडोबा) असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.

दि. १३ जानेवारी २०२२ रोजी माळीवाडा येथील एसबीआयचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न झाला होता. या बाबत पोलिसांना माहिती मिळताच या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता.

सनी भोंड हा एटीएम मशिन ओढताना आढळून आला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पसार झालेल्या चिक्या उर्फ रोहित निवृत्ती मेहेत्रे व सोनू सूरजसिंग भोंड या दोघांनाही अटक केली.

Ahmednagarlive24 Office