एटीएम कार्डामुळे उलगडले अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ हत्याकांड !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- स्वस्त सोनेप्रकरणी चौघांच्या खुनाचा आरोप असलेल्या नरेश जगदीश सोनवणे याला सोमवारी न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांनी १४ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. आरोपीचे वकील अॅड. अनिकेत दीपक भोसले यांनी युक्तिवाद केल्यानंतर ३ दिवसांची पोलिस कोठडी दिली गेली.

सोनवणे हा जळगाव येथे सेंटरिंगचे काम करतो. अन्य २ महिला व २ तरुण बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना न्यायालयात का उभे केले नाही, याची चर्चा सुरू आहे.

२० ऑगस्टला विसापूरफाटा येथे झालेल्या चौघांच्या खूनप्रकरणी जळगावच्या हरिविठ्ठलनगरमधील नरेश ऊर्फ बाबा जगदीश सोनवणे (वय २२),

प्रेमराज रमेश पाटील (२२), योगेश मोहन ठाकूर (२२), कल्पना किशोर सपकाळे (४०) आणि आशाबाई जगदीश सोनवणे (४२) या पाचजणांना पोलिसांनी पकडले. दरम्यान, स्वस्तात सोने घेण्यासाठी आम्ही गेलो होतो.

आमचे वाद झाले, पण आम्ही खून केले नाहीत. लुटीचे प्रकार उघड होऊ नयेत, म्हणून या प्रकरणाला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न फिर्यादी करत अाहेत, असे आरोपींचे म्हणणे आहे.

आपल्याच नातेवाईकांनी खून केल्याची एक फिर्याद बेलवंडी पोलिस ठाण्यात आली आहे. ती आरोपींच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

जळगावच्या एकाचे एटीएम कार्ड घटनास्थळी सापडताच नगरचे पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याशी तातडीने संपर्क साधला.पुढील तपासाची चक्रे योग्य दिशेने गेल्याने अहमदनगर जिल्ह्यातील या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24