लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर अत्याचार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-राहाता परिसरात आयसीआय बँकेच्या मागे रहात असलेला आरोपी नवनाथ रमेश राठोड, मूळ रा. वसंतनगर, तांडा टाकळी, आनंदनगर, ता. माजलगाव, जि. बीड याने एका २३ वर्ष

वयाच्या तरुण विद्यार्थिनीला मी तुझ्याबरोबर लग्न करील, असे आमिष दाखवून लग्नापूर्वीच विद्यार्थिनीची इच्छा नसताना बळजबरीने तिच्यावर शारीरिक संबंध करून बलात्कार केला.

मार्च २०१८ ते १७/९/२०२० दरम्यान हा बलात्काराचा प्रकार घडला. काल याप्रकरणी पिडीत तरुण विद्यार्थिनीने राहाता पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवनाथ रमेश राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ‘डिवायएसपी सातव, पोनि भोये यांनी घटनास्थळी भेट दिली. भोये हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24