अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-मशेरपूर येथील उद्योजक व माजी जि. प. सदस्य बाजीराव शंकर दराडे यांच्यावर गुरुवारी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व मारहाण केल्याच्या आरोपावरून शेणीत
येथील नामदेव आनंदा डामसे (वय ५०) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. दराडे हे शिवसेनेचे नेते असून समशेरपूर गटातील जि. प. सदस्य सुषमा दराडे यांचे पती आहेत.
ही घटना ११ आॅक्टोबरला घडली. संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
देवगावफाटा ते डामसेवाडी रस्त्यावर डांबरीकरण व नळयोजनेचे काम वेळेत सुरू करण्यात यावे, हे विचारण्यासाठी नामदेव डामसे व सागर तळपाडे रविवारी समशेरपूर येथे दराडे यांच्या घरी गेले होते.
संभाषण सुरू असतानाच शुटिंग होत असल्याचा संशय बाजीराव दराडे यांना आला. त्यांनी मारहाण करून मोबाइल काढून घेतला. त्यांच्याजवळील मोबाइलमध्ये बळजबरीने माफीचा व्हिडिओ काढला.
घरातून हाकलून दिल्यानंतर तो व्हीडिओ व्हायरल केला, असे तक्रारीत म्हटले आहे. शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख मधुकर तळपाडे यांनी घटनेची माहिती घेतली.
आमदार डॉ. किरण लहामटे, माजी जि. प. अध्यक्ष अशोक भांगरे यांच्यासह अनेकांनी हस्तक्षेप केल्यानंतर रविवारी दराडे यांच्यावर अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved