अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात धुमाकुळ घालणाऱ्या दोन अट्टल दरोडेखोरांच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
या दरोडेखोरांनी मागील पाच महिन्यात ओतूर, मंचर, लोणीकंद, पाररनेर आणि आळेफाटा परिसरात साथिदारांच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे (वय२६ रा. निघोज ता.पारनेर जि. अहमदनगर), दिपक उर्फ आशिक आझाद काळे (वय २५ रा. निघोज ता. पारनेर जि.अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेल्या एका घरफोडीचा तपास करत असताना अटक करण्यात आलेल्या आरोपींची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
या गुन्ह्यातील आरोपी विशाल हा टाकळीहाजी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी पुणे जिह्यासह नगर जिल्ह्यातही आठ ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,
अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय गिरमकर,
पोलीस हवालदार हनुमंत पासलकर, उमाकांत कुंजीर, विक्रम तापकीर, सचिन गायकवाड, काशीनाथ राजापूरे, पोलीस नाईक दिपक साबळे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश थीगळे, पोलीस शिपाई संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली.