अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- दुचाकीवरून घरी जाणाऱ्या निलेश माधव मेहेरखांब (रा. सुरेगाव, ता.कोपरगाव) यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याप्रकरणी निलेश मेहेरखांब यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी कि, फिर्यादी निलेश माधव मेहेरखांब हे दुचाकीवरून घराकडे जात असताना पी.जे. स्कूल चौकात महिंद्रा जितो गाडीत बसलेला आरोपी प्रवीण गायकवाड याने त्यांना हाक मारून थांबण्यास भाग पाडले.
आरोपी सचिन मेहेरखांब याने गाडी सुरु करून ती फिर्यादी यांच्या अंगावर घातली. गाडीत ठेवलेले हत्यारे लोखंडी रॉड, हॉकी स्टिक, दगड आदींच्या साहाय्याने त्यांच्या पायाच्या नळ्यावर, डोक्यावर, तोंडावर,
छातीवर, पोटावर, मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. या घटनेत निलेश मेहेरखांब गंभीर जखमी झाले आहे. या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.