जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- दोघांमध्ये वाद होऊन तरुणाने पैसे घेणाऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तीन वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यातील निमगावजाळीत घडली होती.

या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला कोर्टाने 5 वर्षे कारावास तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

तर दोघांना निर्दोष मुक्त केले. सतीश दशरथ अरगडे (वय ३८, रा. निमगावजाळी, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, निमगावजाळी येथील रहिवाशी शिवाजी सुखदेव अरगडे याने सतीश दशरथ अरगडे याचेकडून व्याजाने १० हजार रुपये घेतले होते.

ते पैसे मिळावे म्हणून सतीश याने शिवाजीकडे तगादा सुरू केला होता. दरम्यान ५ सप्टेंबर २०१८ रोजी सतीश अरगडे हा शिवाजी अरगडेच्या घरी गेला.

तेथे त्याने शिवीगाळ करत शिवाजीकडे पैशांची मागणी केली. त्या कारणावरून सतीशने शिवाजीच्या हातावर, मानेवर, पाठीवर कोयत्याने वार केले.

तसेच शिवाजीचा भाऊ संजय अरगडेवर देखील कोयत्याने वार केला. जखमी शिवाजी अरगडे व संजय अरगडे यांना उपचारार्थ प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत संभाजी सुखदेव अरगडे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सतीश दशरथ अरगडे, गणपत शिवाजी वदक, शोभा वदक (रा. निमगावजाळी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान न्यायाधीश घुमरे यांनी या गुन्ह्याचा निकाल देत आरोपी सतीश आरगडे याला पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. आहे.