खंडणीसाठी एकास जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीला सक्तमजुरी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- खंडणी देण्यास नकार दिल्याने एकाने त्याच्या जवळील गावठी कट्ट्यातून दुसऱ्यावर डाव्या खांद्यावर तसेच उजव्या पायाच्या घोट्यावर व घोट्याखाली गोळ्या झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पाईपलाईन या ठिकाणी घडली होती.

या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीस 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. योगेश बाळासाहेब कुसळकर (वय- 23 रा. भानसहिवरे ता. नेवासा) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी भारत आसारात जाधव (रा. नगर) यांनी फिर्याद दिली होती. याबाबत माहिती अशी: 28 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी भारत जाधव यांच्याकडे आरोपी योगेश कुसळकर आला.

तुमचे माझ्या बहिणीसोबत असलेले पती-पत्नीचे संबंध कायम करा व मला 4 लाख रूपये द्या. असी मागणी कुसळकर याने जाधव यांच्याकडे केली.

जाधव यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने कुसळकर याने त्याच्या जवळील गावठी कट्ट्यातून जाधव यांच्या डाव्या खांद्यावर तसेच उजव्या पायाच्या घोट्यावर व घोट्याखाली गोळ्या झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात कुसळकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील सी. डी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. सदर खटल्यादरम्यान तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार काळे यांनी मदत केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24