Ahmednagar News : इंदोरी जवळील कुंडमळा या ठिकाणी शुक्रवारी (दि.७) फिरायला आलेला एक तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. दोन दिवसाच्या अथक शोध मोहिमेनंतर रविवारी (दि. ९) त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.
ओमकार बाळासाहेब गायकवाड ( वय २४, रा. अहमदनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान मित्राचा मृतदेह सापडत नसल्याने निराश झालेला त्याचा मित्र आदित्य गायकवाड याने याच ठिकाणी पाण्यात उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
मात्र स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत त्याला बाहेर काढत त्याचे प्राण वाचविले. वर्षा विहाराचा आनंद घेण्याकरिता ओमकार हा मित्रांच्या सोबत कुंडमळा येथे आला होता. सध्या मावळ तालुक्यामध्ये पावसाचा जोर असल्याने येथून वाहणाऱ्या प्रवाहाला देखील वेग आहे.
या प्रवाहामध्ये ओम उतरला असता तो वाहून गेला ओमकार वाहून गेल्याची माहिती तळेगाव पोलीस व मावळ तालुका वन्यजीव संघटना यांना समजल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी घटनास्थळाची व परिसराची पाहणी केली परंतु रात्रीच्या अंधारात शोधमाहीम हाती घेणे शक्य नसल्याने शनिवारी सकाळपासून कुंडमळा येथे ज्या ठिकाणाहून ओंकार वाहून गेला तिथून पुढील काही भागांमध्ये त्याचा शोध घेण्यात आला.
शिवदुर्ग रेस्कू पथक, वन्यजीवरक्षक मावळ व आपदा मित्र या संघटनांचे सुनील गायकवाड, शुभम काकडे, सुरज शिंदे, निलेश गराडे, महेश मसने, राजेन्द्र कडू, जिगर सोळंकी, अनिल आंद्रे, यश बच्चे, विनय सावंत, प्रथमेश सुपेकर, विश्वनाथ जावळकर, कमळ परदेशी, तुषार सातकर, गणेश मोरे, गणेश निसाळ, सचिन गायकवाड, गणेश ढोरे, गणेश गायकवाड, प्रशांत शेडे यांच्या पथकाने ओमकारचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.