अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात खासगी सावकाराच्या ञासाला कंटाळून एका शेतक-याने विषारी ओषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.त्यांची प्रकृती चिंताजनक असुन अहमदनगर येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आत्महत्येयाचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांनी पोलीस निरीक्षकांच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे.त्यामुळे राहुरीचे पोलीस निरीक्षक याबाबत आता काय दखल घेणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे. मानोरी येथील शेतकरी ज्ञानदेव विठ्ठल शेळके यांनी शुक्रवारी विषारी ओषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान त्यांना तात्काळ रूग्णांलयात दाखल करण्यात आले असुन त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामधे लिहले आहे की,मा.पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन राहुरी जि.अहमदनगर यांच्या कडेस मी स्वतः श्री.ज्ञानदेव विठ्ठल शेळके राहणार मानोरी ता.राहुरी जबाब लिहुन देतो की,
मी तीन वर्षांपूर्वी मानोरी गावातील चार लोकांकडून व्याजाने पैसे घेतले आहे.त्याचे आजपर्यंत व्याज दिले आहे.त्या लोकांना मी स्टेट बॅंकेचे चेक दिलेले आहे.सदर लोकांनी मला वारंवार पैक्षाची मागणी करूण मानसिक ञास दिला. त्या ञासाला कंटाळून मी आज रोजी आत्महत्या करीत आहे.
याबाबत माझ्या कुटूंबियाची यात कोणताही प्रकारची चुक नाही त्यांना कुनीही ञास देऊ नये हि विनंती तसेच साहेब मी मेल्यानंतर माझ्या कुटूंबियांना ञास देऊन पैक्षाची मागणी करूण ञास देतील तरी त्यांच्या पासून माझ्या कुटूंबियांचे संरक्षण करावे. या लोकांना मी मुद्दल रक्कम पैक्षा जास्त व्याज दिले आहे.
तसेच माझे बंधू सोपान व रामदास यांना विनंती आहे की,आपल्या आईचा (बाई) सांभाळ करावा व तीचा शेवट गोड करावा हीच माझी शेवटची इच्छा हि विनंती. माझ्या आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरू नये विनंती. आपला शेवटी सही. अशा आशायची चिठ्ठी लिहुन खासगी सावकाराच्या ञासास कंटाळून या शेतक-याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
आता रूग्णांलयात तो शेवटच्या घटका मोजत आणि.आणि त्याने न्यायासाठी पोलीस निरीक्षक यांच्या नावाने चिठ्ठी लिहली आहे.म्हणून या शेतक-याकडुन मुद्दलीपैक्षा जास्त व्याज खावूनही ञास देणाऱ्या सावकारावर काय कायदेशीर कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.