अहमदनगर बातम्या

दसरा मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा – आमदार मोनिकाताई राजळे

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेला दसरा मेळावा या वर्षी मंगळवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता संत भगवानबाबा यांची जन्मभुमी भगवानभक्ती गड सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, माजीमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील सर्वच समाजाच्या भगवानबाबा भक्तांनी पंकजाताई मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहुन मेळावा यशस्वी करावा असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले आहे.

याबाबत राजळे म्हणाल्या की, लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या राजकीय जीवनात, सामाजिक जीवनात राज्यातील गोरगरीब, दीन दुबळ्या जनतेसाठी मोठे काम करून त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणला आहे.

त्यांनी सर्वच समाजातील उपेक्षित, वंचित जनतेला न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे राज्यभरातील जनतेमध्ये त्यांची गरीबांचा कैवारी असलेला नेता अशी प्रतिमा तयार झालेली आहे. स्व.मुंडे सर्वांनाच आपल्या जवळचे वाटतात.

ते हयात असतांना त्यांची जेवढी लोकप्रियता होती त्यापेक्षा दुप्पट लोकप्रियता त्यांच्या मृत्युनंतर आजही कायम आहे व यापुढील अनेक पिढ्या लोकप्रियता वाढत जाणार आहे. दैवत म्हणुन लोक त्यांचे घरघरात फोटो लावुन पुजा करतात.

असा दुर्मीळ नेता पुन्हा होण्यास किती पिढ्या वाट पाहावी लागणार हे सांगता येणे शक्य नाही. त्यामुळे स्व. मुंडे यांचा राजकीय व सामाजिक वारसा खंबीरपणे पुढे चालविणाऱ्या भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या माजीमंत्री पंकजाताई मुंडे यांनी स्व. मुंडे यांनी सुरु केलेली भगवानगड दसरा मेळाव्याची परंपरा यशस्वीपणे पुढे सुरु ठेवली आहे.

या मेळाव्यास राज्यभरातुन उसतोड मजुर तसेच सर्वच समाजाच्या उपेक्षित, वंचीत घटकातील लाखोंच्या संख्येने भगवानबाबा भक्त पंकजाताईचे विचार ऐकण्यासाठी येतात व भगवानबाबांच्या विचाराचे सोने घेऊन गावी परततात. या मेळाव्यातून मिळालेली उर्जा त्यांना वर्षभर मिळत असते.

त्यामुळे यावर्षीचा दसरा मेळावा सावरगाव येथे होणार आहे. त्यामुळे शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुक्यातील सर्वच समाजातील भगवानबाबा भक्त व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सावरगाव येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यास स्वंयस्फुर्तीने लाखोंच्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार राजळे यांनी केले.

Ahmednagarlive24 Office