अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-कोरोना रोखण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सतर्कतेने काम करत आहे. सर्वात जास्त रॅपिड टेस्ट संगमनेर तालुक्यात झाल्या आहेत.
कोरोना पार्श्वभूमीवर गर्दीसह घरगुती समारंभ प्रत्येकाने टाळावे, असे आवाहन नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केले आहे. नगराध्यक्ष तांबे म्हणाल्या, मंत्री थोरात,
आमदार डॉ. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन व सहकारी संस्था कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क आहे. नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असून गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मास्क,
सॅनिटायझर वापर व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. यातूनच आपण कोरोना रोखू शकतो. मात्र ग्रामीण भागात घरगुती समारंभ वाढल्याने होणारी गर्दी चिंताजनक आहे. प्रत्येकाने भावनेपेक्षा परिस्थितीला महत्त्व देत शासन नियम पाळावेत, असे आवाहन तांबे यांनी केले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved