अहमदनगर बातम्या

रेखा जरे हत्याकांडातील ‘त्या’ आरोपीचा जामीन अर्ज…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar News :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील आरोपी सागर भिंगारदिवेचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलिंद कुतर्डीकर यांनी फेटाळून लावला आहे.

रेखा जरे हत्याकांडात सागर भिंगारदिवे याचे नाव समोर आल्यानंतर नगर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

भिंगारदिवे याच्या जामीन अर्जावर न्यायाधीश कुतर्डीकर यांच्यासमोर सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी सरकारतर्फे काम पाहिले. रूग्णाल जरे यांच्यावतीने वकील सचिन पटेकर यांनी काम पाहिले.

जरे यांच्या हत्याकांडात भिंगारदिवे याने सुपारी घेतल्याचा आरोप आहे. सागर हा मोबाईलद्वारे मारेकर्‍यांच्या संपर्कात होता. याबाबत मोबाईल कंपन्यांकडून सीडीआर उपलब्ध आहेत.

घराच्या बाहेरून मोबाईलवर बोलत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या रेकॉर्डिंग झालेले आहे. आरोपीविरुद्ध सबळ पुरावे असल्याने जामीन देऊ नये, असे म्हणणे सरकारी वकिलांनी सादर केले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office