अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-औरंगाबाद रोड, शेंडी येथील बजाज ऑटोचे अधिकृत डिलर जीत बजाज शोरुममध्ये नवीन बजाज मॅक्सिमा झेड भारत स्टेज 6 अॅटो रिक्षाचे वितरण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सहायक परिवहन निरीक्षक कोरडे, जीत मोटर्सचे संचालक इंदरजीत नय्यर, अभिमन्यू नय्यर, राजीव बिंद्रा, जनक आहुजा, अनिश आहुजा, सागर पवार, आफ्रिदी सय्यद, फिरोज शेख आदि उपस्थित होते. या पहिल्या गाडीचे वितरण कलिम शेख यांना करण्यात आले.
दीपक पाटील म्हणाले की, पर्यावरणाच्या दृष्टीने बी.एस.6 ही वाहनप्रणाली महत्त्वपुर्ण आहे. यामुळे प्रदुषणावर नियंत्रण राहणार असल्याचे सांगितले. अभिमन्यू नय्यर यांनी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने बी.एस.6 ही वाहनप्रणाली महत्त्वपुर्ण भूमिका बजावणार आहे.
बेरोजगार युवक कमी पैशाची गुंतवणुक करुन आपला व्यवसाय सुरु करु शकणार असल्याचे स्पष्ट केले. नवीन बजाज मॅक्सिमा झेड भारत स्टेज 6 अॅटो रिक्षा एलपीजी मध्ये उपलब्ध आहे. 236 सीसीचे शक्तीशाली इंजन असून, शहरासह ग्रामीण भागातील साध्या रस्त्यावर ही रिक्षा चांगली चालते.
अॅवरेज अधिक, पॉवर इंजिन, पॉवर कपलिंगयांसह मेंन्टनेस खर्च कमी असल्याचा दावा शोरुमच्या वतीने करण्यात आला आहे. या रिक्षाला ग्राहकांची पसंती मिळत असून, सदर वाहनासाठी मागणी वाढली आहे. गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर याची बुकिंग चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.