अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-श्रीगोंद तालुक्यातील लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतमधील अनियमित कामामध्ये ग्रामपंचायत सरपंच रामदास ठोंबरे यांच्यावर अपात्रेची कारवाई करणे संदर्भात प्रस्ताव का केला अशी विचारणा करत
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी शिवीगाळ करत दमबाजी केली आणि गटविकास अधिकारी काळे यांचे दिशेनं बूट फिरकवला.
या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात प्रशांत काळे यांच्या फिर्यादीवरून नाहाटा यांना श्रीगोंदे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी अटक केली.
नाहाटा यांनी गटविकास अधिकारी काळे यांच्या अंगावर धावत शिवीगाळ करत दमबाजी केली आणि गटविकास अधिकारी काळे यांचे दिशेला बुट फिरकवल्याने गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात धाव घेत
नाहाटा यांच्या विरोधातगुन्हा दाखल केला. श्रीगोंदे पोलीसांनी नाहाटा यांना अटक केली. या प्रकरणी अधिक तपास निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिलीप तेजनकर हे करत आहेत.
मागील महिन्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी मागील महिन्यात कोरोना विषयक शासकीय आढावा बैठक घेतली होती.
या बैठकीत बाळासाहेब नाहाटा यांनी प्रशासनाचे व एका राजकीय पुढाऱ्याचे वाभाडे काढले होते याचा वचपा काढल्याची चर्चा नाहाटा समर्थक आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू होती.