अहमदनगर बातम्या

बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने संगमनेरच नाहीतर अख्ख्या महाराष्ट्रात हळहळ! संगमनेर तालुक्यात भयाण शांतता

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News:- 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि कुणालाच विश्वास बसणार नाही इतक्या जागा या महायुतीला मिळाल्या. खरं पाहायला गेले तर अशा प्रकारचा निकाल खुद्द महायुतीला देखील अपेक्षित नव्हता. परंतु नेमके असे काय घडले की इतक्या मोठ्या आणि प्रचंड प्रमाणात बहुमत हे महायुतीला मिळाले.

तसेच हा निकाल जर दुसऱ्या बाजूने पाहिला किंवा त्याचे विश्लेषण केले तर यामध्ये महाराष्ट्रातील काही विधानसभा मतदारसंघांचा निकाल हा अतिशय धक्कादायक आणि अनपेक्षितरित्या लागले.ज्या निकालाची महाराष्ट्रातील कोणीही कधीही विचार केला नसेल असे निकाल समोर आले व त्यातील एक निकाल होता तो म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा.

गेले 40 वर्षापासून या मतदारसंघाचे नेतृत्व महाराष्ट्रातील राजकारणात अत्यंत संयमी आणि मितभाषी व तितकेच सगळ्यांना हवे हवेसे वाटणारे व शांत स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब थोरात हे करत होते व त्यांचाच या निवडणुकीत अतिशय नवख्या उमेदवाराने पराभव केला व हा पराभवाचा झटका संगमनेर तालुक्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लागला व देशपातळीवर देखील या निकालाची नोंद घेतली गेली.

संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा निकाल संगमनेरसाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी धक्का देणारा
बाळासाहेब थोरात म्हटले म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत चेहरा आणि सर्वांना पुढे घेऊन जाणारे एक नेतृत्व म्हणून त्यांना ओळखले जाते. परंतु या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला व या अनाकलनीय अशा पराभवामुळे संगमनेर तालुका व त्यासह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला.

कोणी स्वप्नात देखील विचार केला नसेल असा निकाल त्या दिवशी आला. विशेष म्हणजे जेव्हा असा निकाल आला तेव्हा कुणाचाच विश्वास यावर बसत न होता व हा निकाला ऐकल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू देखील तरळले. संगमनेर तालुक्यात तर भयान शांतता निर्माण झाली.

तसेच या निकालाची नोंद संपूर्ण राज्यात घेतली गेली व अनेक ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया देखील उमटल्या व थोरात यांचा पराभव हा महाराष्ट्रातील अनेकांना सहन झाला नाही.

विशेष म्हणजे त्या दिवशी संगमनेर तालुक्यात काही घरात चुली देखील पेटल्या नाहीत किंवा काहींनी तर स्वतःला घरात बंद करून घेतले. या पराभवामुळे राजकारण तसेच साहित्य व कलाक्षेत्रातील व्यक्तींनी देखील दुःख व्यक्त केले. देशभरातील मीडियाने देखील हा अनाकलनीय व अपेक्षित निकाल असल्याचे म्हटले आहे.

बाळासाहेबांना भेटण्यासाठी राज्यभरातील मान्यवरांची संगमनेरमध्ये हजेरी
जर आपण निकालाच्या दुसऱ्या दिवशीचे चित्र बघितले तर रविवारी सकाळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटण्यासाठी राज्यातील अनेक मान्यवर व्यक्तींनी संगमनेरमध्ये हजेरी लावली. तसेच संगमनेर तालुक्यातील जनता देखील त्यांच्या सुदर्शन या निवासस्थानी मोठ्या संख्येने दाखल झालेली होती.

विशेष म्हणजे हा निकाल कोणालाच मान्य नसून ईव्हीएम मध्ये काहीतरी गोंधळ असल्याची शंका या निमित्ताने उपस्थित करण्यात आली.या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील साकुर भागातील अनेक गावांना भेटी दिल्या व नागरिकांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्यांनी म्हटले की संघर्षामध्ये तुम्ही लढले आणि आम्ही देखील सदैव तुमच्या पाठीशी आहोत. सत्ता असो वा नसो साहेब तुम्ही साहेब आहात असे दर्शवत संगमनेर तालुक्यातील तरुणाई सह प्रत्येकाच्या स्टेटसवर बाळासाहेब थोरात यांच्याशी एकनिष्ठतेची झलक मात्र झळकताना दिसली.

Ajay Patil