बळीराजा चिंतेत! ‘त्या’ शेतकर्‍यांची कर्जमाफी रखडली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आखली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत पीककर्ज सरसकट माफ केले.

मात्र, दोन लाखांच्यावर पीककर्ज असलेल्या शेतकर्‍यांना मात्र कर्जमाफी मिळाली नाही. ही कर्जमाफी कधी मिळणार? व नवीन पीककर्ज कधी मिळणार? अशा संभ्रमांत आता बळीराजा पडला आहे.

सरकारने लवकरच यावर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करावे लागेल अशा विचारांत शेतकरी आहे. सरकारच्या धोरणानुसार पाच एकरापर्यंत शेती असणार्‍या

अल्पभूधारक शेतकर्‍यांना दोन लाखांपर्यंत व दोन लाखांच्यावर कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना दोन लाख रुपये कर्जमाफी देण्यात येईल आणि नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात

आली होती. परंतु अद्यापपर्यंत दोन लाखांच्यावर कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही. याबाबत काही कारवाई होत नसल्याने शेतकरी बांधवांमध्ये तिव्र नाराजी असून शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत अशी माहिती शेतकरी नेते राजेंद्र लोंढे यांनी दिली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24