बळीराजा चिंताग्रस्त… कांद्याचे भाव घसरले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दराने विक्रमी झेप घेतली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट चांगलेच कोलमडले होते. दरम्यान दिवसेंदिवस कांद्याचे भाव वाढत चालल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं.

तर नागरिकांमध्ये नाखुषीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता कांद्याच्या भावाची उतरण सुरु असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ऑक्टोबरमध्ये कांद्याला सात ते आठ हजारांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळाला होता‌, परंतु महिनाभरातच तब्बल तीन हजारांनी घसरून कांदा चार हजार रुपये क्विंटलवर आला.

त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जास्त पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई अद्याप काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यंदा पावसाने झोडल्यामुळे उत्पादनात घट झाली. जो माल हाती लागला, त्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती.

२२ ऑक्टोबरपासून कांदा सात ते आठ हजार रुपये क्विंटल दराने विकला गेला. अपवादात्मक गोणीला आठ हजारांवर भाव मिळाला. या भावात सातत्य राहावे, दर घसरू नयेत यासाठी उपाययोजना करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, परंतु त्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24