अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- करंजी येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेतील मॅनेजर कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. त्यामुळे बँकेचे व्यवहार पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय बँक व्यवस्थापनाने घेतला आहे.
येथील राष्ट्रीयकृत बँकेत मॅनेजर पदावर काम करत असलेल्या हे अधिकारी दररोज नगर येथून ये जा करत होते. नगर येथील त्यांच्या मुख्य शाखेतीलच काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
त्यांच्या संपर्कात करंजीचे बँक मॅनेजर आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली. करंजी येथे बँक मॅनेजर येथील शाखेतील इतर कर्मचाऱ्यांच्या व अथवा खातेदारांच्या मात्र संपर्कात आलेले
नसल्याचे बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले असले तरी खातेदारासह जिल्हा सहकारी बँकेसह इतर को-ऑपरेटीव्ह बँकेकडून देखील सावधानता बाळगली जात आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved