बारामती पॅटर्न म्हणजे भुलभुलैय्या नवे पर्व आणि आता विसरा सर्व : राम शिंदे यांची आ.रोहीत पवारांवर टीका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- एक वर्षे पूर्ण होऊनही मतदारसंघात एकही विकासकाम अथवा उद्योगधंदे आणले नाहीत, मात्र पवार यांनी स्वत:चेच उद्योगधंदे वाढवले व जनतेला वेड्यात काढले.

निवडणुकी दरम्यान घोषणा केलेला बारामती पॅटर्न म्हणजे निव्वळ भुलभुलैया आहे. नवे पर्व आणि आता विसरा सर्व अशी घणाघाती टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केली. महाविकास आघाडी सरकारच्या विधानसभा निवडणुकीच्या वर्षपूर्ती निमित्त जामखेड तालुक्याने काय कमावले काय गमावले, या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री प्रा राम शिंदे बोलत होते.

ते म्हणाले विधानसभा निवडणुकीला नुकतेच एक वर्ष झालं. मात्र गेल्या वर्षभरात कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात एकही असे भरीव काम दिसुन आले नाही, असा आरोप करीत प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली. गेल्या वर्षभरात आ. पवार यांची कारकीर्द कशी राहिली, याचा लेखाजोखा मतदारांनी घेतला पाहिजे असे सांगून शिंदे म्हणाले की, ‘गेल्या वर्षभरात या मतदारसंघातील मतदारांनी आपले सर्वस्व गमावले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर जामखेडला एका महिन्यात कुकडीचे पाणी व एमआयडीसी येणार होती ती आता कुठे गेली? गेल्या वर्षभरात एकही विकास काम झाले नाही, मात्र मंजूर झालेल्या विकास कामाचे श्रेय लाटण्यात ते पटाईत आहेत. महाविकास आघाडीने युती सरकारच्या काळातील अनेक योजना बंद केल्या. सोशल मिडीयाच्या माध्यमातून स्वत:चे बी बियाणे, कोंबड्यांची पिल्ले, माशांची पिल्ले विक्रीचा व्यवसाय वाढवला.

मतदारसंघात शेतीसाठी पाणी आणने तर दुरच पण पावसाच्या पाण्याचे जलपुजन केले. अगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या कामांना लागायचे असून, या सर्व ठिकाणी भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला.

चौकट :- जलयुक्तची खुशाल चौकशी करा : प्रा.शिंदे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याच्या आ.पवार यांच्या मागणीची दखल घेऊन मंत्रीमंडळात देखील चौकशीची मागणी करण्यात आली असून, त्यांनी खुशाल संपूर्ण महाराष्ट्रात व जामखेड व कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना विचारावे आणि पाणी कुठे मुरले व जिरले ते शेतकरी सांगतील.

या कामाच्या मंजुरीसाठी शिवार फेरी, ग्रामपंचायतीची ग्रामसभेचा ठराव, कृषी अधिकारी यांचा अहवाल आणि तहसीलदारांचा अहवाल त्यानंतर आयुक्ताची मंजुरी यासाठी सर्व प्रकारचे ऑडीट या सर्व मंजुरी नंतरच जलयुक्त शिवारचे कामे पूर्ण झाली आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रासह जामखेड व कर्जत तालुक्यातील शेतकरी आज समाधानी आहे.

चौकट :- त्यांच्याच कारखान्याची चौकशी सुरू आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्याच कन्नड येथील सहकारी साखर कारखान्याची ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. थोड्याच दिवसात त्याचा निकाल लागेल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24