अहमदनगर बातम्या

सावधान! तुमच्याही शेतातील सोलर पंपाची होऊ शकते चोरी; ‘येथे’ झाली

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- सौरकृषी पंप योजनेअंतर्गत शेतामध्ये बसविलेल्या पाच एचपीचा सोलर पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. नगर तालुक्यातील कौडगाव शिवारात बाळेवाडी रोडवरील गट नंबर 59/1 मध्ये ही घटना घडली.

याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी राहुल सुधाकर खर्से (वय 39 रा. कौडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांची बाळेवाडी रोडवर शेतजमीन आहे. त्यांना सौरकृषी पंप योजनेअंतर्गत पाच एचपीचा सोलर पंंप मंजूर झाला होता. तो त्यांनी शेतामध्ये बसविला होता.

चोरट्याने हा सोलर पंपच चोरून नेला आहे. हा प्रकार लक्षात येताच शेतकरी खर्से यांनी पोलिसांंत फिर्याद दाखल केली आहे. गुन्ह्याचा तपासा पोलीस नाईक घोडके करीत आहेत.

दरम्यान सोलर पंप चोरीला जात असल्याच्या घटना यापूर्वी नगर तालुक्यात घडल्या आहेत. यामुळे शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत. सोलर पंंपाची किंमत जास्त असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा सोलर पंप चोरीकडे वलविला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office