अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- ऐन दिवाळीच्या सणोत्सव काळात नगर शहरातून एक अत्यंत महत्वाची व धक्कादायक माहितीसमोर येत आहे. नगर शहरातील सक्कर चौकातील वाहन पार्किंग येथे एक हजार 500 किलो बनावट खवा अन्न प्रशासनाने पकडला आहे.
हा खवा गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून ट्रॅव्हल्समधून नगर शहरात आणला जात असल्याची बाब समोर आली आहे. तपासणीसाठी नमुने घेऊन हा माल तत्काळ नष्ठ केला जाणार आहे.
तसेच सर्व दोषींवर अन्नसुरक्षा कायद्यातंर्गत कारवाई केली जणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर आरोग्यास अतिशय हानिकारक असलेला हा खवा स्वरूपातील पदार्थावर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दूध तापवून ते घट्ट करून तयार केलेल्या पदार्थाला खवा म्हटले जाते. यापासून पेढे, मिठाई तयार केली जाते.
मात्र अन्न प्रशासनाने जप्त केलेला खवा पाम तेल, दूध पावडर, साखर असे पदार्थ एकत्र करून तयार केला जातो. स्वस्तात मिळत असल्याने गुजरात येथून या खव्याची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते.
हाच बनावट खवा बहुतांशी दुकानदार थेट मिठाई म्हणून विक्री करतात. अहमदाबाद येथून ट्रॅव्हल्समधून बनावट खवा नगरमध्ये आणला असल्याची माहिती अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांना मिळाली होती.
शिंदे यांनी पथकासह ट्रॅव्हल्सची तपासणी केली तेव्हा सिटांच्या खाली व ट्रॅव्हल्सच्या पाठीमागील बाजुला गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट खव्याचा साठा आढळून आला. या खव्याची दोन लाख रूपयांपेक्षा जास्त किंमत आहे.