अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- दुचाकी व चारचाकी वाहनातून आलेल्या पाच जणांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण करत त्या व्यक्तीची दुचाकी घेऊन पळून गेले आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार नगर तालुक्यातील वरणगाव ते खेडगाव रोडवर घडला आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात पाच जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणानंतर जखमी संदीप मच्छिंद्र वाघ (रा.खंडाळा, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
वाघ हे रात्रीच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून अरणगाव ते केडगाव रोडवरून जात असताना खेडेगाव शिवारातील हॉटेल मैत्री जवळ लघुशंकेसाठी थांबली.
या वेळी दुचाकीवरून आलेला एक व चारचाकी वाहनातून आलेले तीन ते चार जणांनी जणांनी गजाने मारहाण करून वाघ यांना जखमी केले. त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महाजन यांनी रुग्णालयात जाऊन वाघ यांचा जबाब नोंदवला असून त्यावरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार करीत आहे.