अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-नववर्षाचे स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी झाली होती. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस पथके देखील तैनात करण्यात आली होती.
दरम्यान लायसन्स नसताना दारू विक्री करणाऱ्या एका हॉटेलबाबत पोलिसांना माहिती मिळाली. या ठिकाणी धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
हि धक्कादायक घटना सावेडीतील सहकारनगर येथील मातोश्री हॉटेलमध्ये घडली आहे. याबाबत अधिनिक माहिती अशी कि, नववर्षांच्या अनुषंगाने गुरूवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांचे पथक रात्री गस्तीवर होते.
रात्री 10 वाजेच्या सुमारास मातोश्री हॉटेलमध्ये लोक बेकायदा दारू पित बसल्याची माहिती पथकाला कळाली. पथक कारवाईसाठी रात्री सव्वा दहाच्या सुमारास तेथे पोहोचले.दोघेजण दारू पिताना पोलीस पथकाला दिसले.
त्यातील एकाला नाव पत्ता विचारला असता, त्याने अरेरावीची भाषा केली. मला ओळखले नाही का? तुमची आता वाटच लावतो. नोकर्याच घालवतो, असे म्हणत त्याने क्षीरसागर यांना मारहाण केली.
इतर पोलीस पथकाने मध्यस्थी करत वाद सोडविला. दरम्यान पोलीस हवालदार सुधीर क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून अमोल प्रकाश कोठारी (रा. बोरुडेमळा, बालिकाश्रम रोड) याच्याविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक केली आहे.