‘तू सुनेला का नांदवत नाहीस’ असे म्हणत माय लेकास मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- कौटुंबिक कलहाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यामुळे महिला आत्महत्येचे प्रमाण देखील वाढत आहे. दरम्यान अशाच कौटुंबिक कलहातून माय लेकास मारहाण झाल्याची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे.

सुनेला का नांदवत नाही, असे म्हणत आईला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून आपल्यालाही बळजबरीने गाडीत घालून दोन लाखांची मागणी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार हंडीनिमगाव येथील संदीप वसंत कुऱ्हाडे (वय ३६) यांनी नेवासे पोलिसांकडे दिली.

संदीप यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे, माझे व पत्नी उषाचा कोर्टात वाद चालू आहे. मी व माझे वडील दवाखान्यात गेलो असताना पांढऱ्या स्विफ्ट कारमधून आलेले दोन पुरुष व दोन महिलांनी ‘तू सुनेला का नांदवत नाहीस’ असे म्हणत माझ्या आईला शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

आईने फोन केल्यानंतर मी घरी आल्यावर मलाही बळजबरीने गाडीत बसवत नेवासे येथे नेले. तुझे व बायकोचे भांडण मिटवायचे असेल, तर दोन लाख रुपये दे; अन्यथा तुला जीवे ठार मारू, अशी धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी नितीन मोतिराम शिंदे (भेंडे, ता. नेवासे), नाथा रामभाऊ मांजरे (मातापूर, ता. श्रीरामपूर),

सविता शिंदे (सातारा) यांसह आणखी एक अनोळखी महिला व दोन अनोळखी पुरुष अशा एकूण सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल प्रीतम मोढवे करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24