उधार दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून एकास मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-उसने दिलेले पैसे परत मागीतल्याचा राग येऊन आरोपी विजय पांडुरंग वाघ, निलेश विजय वाघ, गणेश विजय वाघ, ससतीश पांडुरंग वाघ यांनी फिर्यादी रवींद्र माधव वाघ (वय-४०) यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी रवींद्र वाघ यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील फिर्यादी रवींद्र वाघ व आरोपी विजय पांडुरंग वाघ, निलेश विजय वाघ, गणेश विजय वाघ, सतीश पांडुरंग वाघ हे रहिवाशी असून त्यांची घरे जवळ-जवळच आहे.

यातील फिर्यादी रवींद्र वाघ याने आरोपी विजय वाघ यांचेकडे घेतलेले उसने पैसे मागितले. याचाच राग आल्याने आरोपींनी हातातील लाकडी दांड्याने फिर्यादी रवींद्र वाघ यास मारहाण केली आहे.

त्यांस लाथा बुक्यांनी मारहाण करून जखमी केले आहे. जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी फिर्यादी रवींद्र वाघ याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24