अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : जुन्या वादाच्या रागातून कुर्हाडीने व शस्त्राने मारहाण करण्याचा घटनेत ६ लोक जखमी झाले आहेत. नेवासा तालुक्यातील दिघे येथे ही घटना घडली.
याबबात चंद्रकांत कडुबाळ चव्हाण (वय 35) रा. दिघी ता. नेवासा यांनी जबाब दिला आहे. यात त्यांनी म्हटले की, 9 जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मी तसेच अशोक कडूबाळ चव्हाण,
सुवर्णा चंद्रकांत चव्हाण (पत्नी), मयुरी अशोक चव्हाण (पुतणी), जनाबाई कडूबाळ चव्हाण, सुनीता अशोक चव्हाण (भावजई) असे घरी असताना मागील भांडणाच्या वादातून भागचंद नाथा शिंदे,
रोहीदास नाथा शिंदे, रावसाहेब नाथा शिंदे, सतीष रावसाहेब शिंदे, रवींद्र रोहीदास शिंदे सर्व रा. दिघी ता. नेवासा तसेच अमोल अंकुश निकम रा सलबतपूर, अमोल दत्तात्रय निकम,
दत्तात्रय निकम (पुर्ण नाव माहीत नाही) दोघे रा. बाभुळखेड़ा ता नेवासा, सुनिल अंकुश निकम (रा. सलाबतपूर) यांनी शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचे म्हटले आहे.
या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी वरील 9 जणांविरुद्ध मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews