अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-राहुरी परिसरातील वळण – पिंप्रीभागात राहणारा तरुण विक्रम गोरख पवार याला दोघा आरोपींनी तुला उसने दिलेले पैसे वारंवार मागून सुद्धा तू देत नाही, असे म्हणत शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण केली.
यावेळी विक्रम यांचे वडील गोरख मोहन पवार हे सोडविण्यास आले असता त्यांना डोक्यात दगड मारून डोके फोडले. तुम्ही येथे कसे रहाता, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली,
जखमी गोरख पवार यांच्या फिर्यादीवरुन मारहाण करणारे आरोपी विजय भीमराज माळी, महेश भाऊसाहेब जाधव, दोघे रा. वळणपिंप्री, ता. राहरी यांच्याविरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काल सायंकाळी ७.३० वा. हा प्रकार घडला. पोलीस निरीक्षक जाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना दिवटे हे पुढील तपास करीत आहेत